esakal | मोठी बातमी : गावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची 'ही' खास योजना, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

st.

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाला परिवहन मंत्री अनिल परब यांनी परवानगी दिली आहे.

मोठी बातमी : गावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची 'ही' खास योजना, वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी मोफत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या सुमारे 10 हजार बसगाड्या सज्ज आहेत. या योजनेची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. 7) करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : प्रशासनाला सुनावलं, क्वारंटाईन करण्याबद्दल मुंबई हायकोर्ट म्हणतंय...  

हा संपूर्ण खर्च मदत व पुनर्वसन विभागाद्वारे करणार असल्याची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून, गरज भासल्यास राज्य सरकार त्यापेक्षा जास्त खर्च करेल, असे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी : ...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द !

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाला परिवहन मंत्री अनिल परब यांनी परवानगी दिली आहे. या मोफत सेवेसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला सुमारे 20 कोटींचा निधी दिला जाईल.  त्यामुळे मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत अडकलेले विद्यार्थी, कामगार, नागरिकांना चार ते पाच दिवसांत त्यांच्या जिल्ह्यांत सोडले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

ST will provide free service to the citizens who want to go to the village

loading image
go to top