ST Workers Protest
ST Workers Protest Sakal

सदावर्तेंच्या भाषणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

ST कर्मचाऱ्यांनी मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्ह ओक बंगल्यावर अचानक केलेल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ST कर्मचाऱ्यांसदर्भातील याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत होत असताना अचानकपणे झालेला प्रकार दुर्देवी आहे. ही घटना निश्चितच काळजीची होती, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केले आहे.

ST Workers Protest
'माझी आई आणि मुलगी घरात..' सुप्रिया सुळे थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात

शरद पवारांच्या बंगल्यावर आंदोलनकर्ते पोहचले कसे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यासंदर्भातही चौकशी केली जाणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कोणी भडकवण्याचे काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एसटी कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत. कोण आंदोलक होते? हे तपासातून समोर येईल. याशिवाय पोलिस सदावर्ते यांच्या भाषणाची चौकशी करतील. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

ST Workers Protest
ST कर्मचाऱ्यांचे पवारांच्या घराबाहेरील निदर्शने अनाठायी : दिलीप वळसे-पाटील

महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. या घटेनची माहिती मिळताच मी स्वतः सुप्रिया ताई यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याशी बोलणं झालं असून परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिलीये. काही यज्ञात शक्ती असे घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या चुका झाल्यात त्या तपासल्या जातील. कोण आंदोलक होते, खरेच आंदोलक होते हे तपासले जाईल. न्यायालयात समोर या आंदोलनाचा तपशील ठेवायचा का हे तज्ज्ञांशी चर्चा करून ठरवू, असेही ते म्हणाले. कायदा असला तरीही सहानुभूती म्हणून आम्ही आझाद मैदानात परवानगी दिली. न्यायालयाने विलीकरण शक्य नाही हे सांगून ही आंदोलन करणे चुकीचे आहे, असेही सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com