
कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी चौकशी किंवा विचारपूस करण्यात आली नाही. त्यामूळे एसटी कामगारांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे.
मोठी बातमी - ...अन्यथा एसटी कामगार 22 जुनपासून जाणार सामुहीक रजेवर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी कामगारांची तपासणी होत नाही. त्याशिवाय मुंबई, ठाणे विभागातील एसटी कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार न मिळाल्याने संतप्त एसटी कामगारांनी 22 जुनपासून सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीत एसटी कामगारांनी मुंबई आगार व्यवस्थापकांना निवेदन दिलं असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवण्यात आली आहे.
एसटी महामंडळातील 7 कामगारांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर काहींना क्वारंटाईन आणि अनेक कर्मचाऱ्यांना संशयीत घोषीत करून रजेचे अर्ज देऊन सुट्टीवर घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी चौकशी किंवा विचारपूस करण्यात आली नाही. त्यामूळे एसटी कामगारांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे.
मोठी बातमी - 4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?
मुंबई आगारात सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची 90 टक्के उपस्थित असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तिनतेरा वाजले आहेत. तर मुंबई आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्याचे वेतन न मिळाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आगारातील सर्व कर्मचारी स्वतःची आरोग्य तपासणी करण्यासाठी 22 जुनपासून सामुहीक रजेवर जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.
राज्यात सर्व एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. अशात राज्याचे मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, यांनी कामगारांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असतानाही एसटी महामंडळाने त्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप सुद्धा एसटी कामगारांनी केला आहे. मुंबई, ठाणे या विभागातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याने, कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आणि उद्रेक निर्माण झाला आहे.
मोठी बातमी - एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय
मुंबई विभागातील कुर्ला कार्यशाळा 1, कुर्ला नेहरू नगर 3, परळ 2, मुंबई आगार 1 असे एकूण 7 तर ठाणे विभागातील एकूण 11 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये चालक, वाहक, यांत्रीक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्येच मुंबई विभागात आतापर्यंत चार कर्मचारी होम क्वारंटाईन आणि 10 कर्मचाऱ्यांना संशयीत राजा देण्यात आली आहे .
विभाग पातळीवर विभाग नियंत्रक या प्रकरणात निर्णय घेतील. प्रत्येक आगार स्तरावर कामगार अधिकारी सुद्धा असतात, ते आगार व्यवस्थापकांना यासंदर्भातील मार्गदर्शन करतील. कामगारांच्या निवेदनावर कारवाई करण्याची ही पद्धत आहे. असं कर्मचारी वर्ग औद्योगीक संबंध महाव्यवस्थापक शैलेद्र चव्हाण म्हणालेत. दरम्यान, या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यावर योग्य कारवाई करणार असल्याचं मुंबई विभाग नियंत्रक संजय सुर्वे यांनी केलीये.
ST workers warns government for not conducting covid test and for not giving salaries
Web Title: St Workers Warns Government Not Conducting Covid Test And Not Giving Salaries
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..