esakal | एअर इंडिया युनियन्सनी दिला संपाचा इशारा | Air india
sakal

बोलून बातमी शोधा

Air-India

एअर इंडिया युनियन्सनी दिला संपाचा इशारा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत (Mumbai) कलिना येथे एअर इंडियाचे (Air inida) स्टाफ क्वार्टर्स आहेत. ही क्वार्टर्स (Kalina staff quarter) सहा महिन्यात रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या विरोधात कर्मचारी युनियन्स आक्रमक झाल्या आहेत. एअर इंडियाच्या कर्मचारी युनियनने संपाची नोटीस दिली आहे. एअर इंडिया युनियनच्या (air india union) संयुक्त कृती समितीने बुधवारी मुंबई प्रदेश कामगार आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

दोन नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. नियमानुसार संपावर जाण्याआधी युनियन्सना दोन आठवडे आधी नोटीस द्यावी लागते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. कलिना येथे एअर इंडिया कॉलनीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५ ऑक्टोबरला पत्र पाठवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं खासगीकरण झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आता घरं रिकामी करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत हमीपत्र लिहून देण्यास सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: शिवसेनेत शांतता, मात्र वादळापूर्वीची!

मुंबईत कलिना आणि दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एअर इंडियाची कॉलनी आहे. दिल्ली आणि मुंबईमधल्या स्थिती संदर्भात युनियन्सची दररोज चर्चा सुरु आहे आणि बंदबाबत निर्णय घेऊ असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: बैलांच्या नसबंदींवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे

"ज्या जमिनीवर या कॉलनीज उभ्या आहेत. ती जागा एएआयने एअर इंडियाला भाड्यावर दिली आहे. AAI कडे या जागेची मालकी आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड भाडेकरु आहे" असे युनियनने पत्रात म्हटले आहे. "एअरपोर्ट जमिनीवर अनेक झोपडपट्टया सुद्धा आहेत. पण त्यांना नोटीस बजावलेली नाही" असे पत्रात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत त्या क्वार्टर्समध्ये राहण्याची परवानगी द्यावी, अशी युनियनची मागणी आहे.

loading image
go to top