वसई-विरार महापालिका खड्डे मुक्तीच्या दिशेने ; रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी खर्च 

संदीप पंडित
Sunday, 1 November 2020

वसई-विरार महापालिकेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळेच निर्माण झाले होते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तर नेहमीची झाली होती. खड्डे बुजवण्यात यावेत म्हणून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने देखील केली. मात्र पावसाळ्याचे कारण देत खड्डे बुजवण्याचा कामाला महापालिकेकडून बगल देण्यात येत होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पालिकेने 9 प्रभागांमधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

विरार  ः वसई-विरार महापालिकेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळेच निर्माण झाले होते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तर नेहमीची झाली होती. खड्डे बुजवण्यात यावेत म्हणून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने देखील केली. मात्र पावसाळ्याचे कारण देत खड्डे बुजवण्याचा कामाला महापालिकेकडून बगल देण्यात येत होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पालिकेने 9 प्रभागांमधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी तब्बल पाच कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्य पोलिस कोरोनामुक्तीच्या दिशेने? बाधित पोलिसांची संख्या घटली

दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे झाल्यावर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात वाद प्रतिवाद सुरू होतात. खड्डे कोणी बुजवायचे यावरून दावे-प्रतिदावे देखील करण्यात येतात. मात्र यामध्ये खड्डे तर बुजवले जात नाहीत, मात्र नाहक सामान्यांना त्रास सहन करावा लागतो. या वर्षी वसई-विरार महापालिकेने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात पाऊस बाधा आणत असल्याचे कारण पुढे केले होते. रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. मनसे, बहुजन पक्षाने आंदोलने केली होती. गणपती, नवरात्रोत्सव गेल्यानंतर अखेर पालिकेला खड्डे बुजविण्यास वेळ मिळाला असून हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यास पालिकेने वर्षासाठी 20 कोटींची तरतूद केली असून आता, खड्डे बुजवण्यासाठी पाच कोटी खर्च होण्याचा अंदाज असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नवी मुंबईत लसीसाठी तयारी सुरू

 

 
पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास अडथळा येत होता; परंतु आता पाऊस थांबल्याने खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
- राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, वसई-विरार महानगर पालिका. 

 

 

Start filling of potholes on the roads of Vasai Virar Municipal Corporation

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start filling of potholes on the roads of Vasai Virar Municipal Corporation