अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करा...

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करा...

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात महाराष्ट्रात आता लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी नाहीये. काही कर्मचारी हे मुंबई उपनगरीय भागात राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी बीएमसीकडून करण्यात आली आहे.

डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी, किराणा मालाच्या दुकानातले कर्मचारी इत्यादी सर्वांना लॉकडाऊन असूनही आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कामाला जावं लागतंय. त्यात यातील बहुतांश कर्मचारी हे  मुंबईच्या बाहेर म्हणजेच  विरार, वसई, पनवेल, बदलापूर, खोपोली, कल्याण, डोंबिवली,अंबरनाथ या भागात राहतात. त्यांना दररोज मुंबईत कामानिमित्त प्रवास करावा लागतो. मात्र लोकल बंद असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे आता बीएमसीनं रेल्वे प्रशासनाकडे या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेनं या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णयात घेतला आहे. मात्र काही बेस्ट कर्मचारी, चालक कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीनं बस चालवण्यासाठी नकार देत आहेत. तर काही दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेस्टनंही प्रवास करणं शक्य होत नाहीये.    

"मला टिटवाळ्याहून कारनं येण्यासाठी २ तास आणि जाण्यासाठी २ तास लागतात, म्हणून मी एका लॉजच्या मालकाला मला एक राहण्यासाठी एक खोली देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून माझे ४ तास वाचतील." असं एका पोलिस अधिकाऱ्यानं म्हंटलंय.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना बहुतांश वेळ प्रवासात घालवावा लागतोय. त्यांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना वेळेत कामाला येऊन वेळेत घरी पोहचता यावं म्हणून बीएमसीनं मध्य रेल्वे प्रशासनाकडे काही लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. आता रेल्वे प्रशासन ही मागणी मान्य करून लोकलसेवा करतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे.

start locals for the people working in emergency services 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com