esakal | NTC च्या गिरण्या लवकरत लवकरात सुरू करा - खासदार सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

NTC च्या गिरण्या लवकरत लवकरात सुरू करा - खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) अंतर्गत येणाऱ्या चालू पण कोरोनामुळे बंद असलेल्या गिरण्या लवकरात लवकर सुरू करा,असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी प्रशासनाला केले आहे.

NTC च्या गिरण्या लवकरत लवकरात सुरू करा - खासदार सुप्रिया सुळे

sakal_logo
By
सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई, ता. 25 : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) अंतर्गत येणाऱ्या चालू पण कोरोनामुळे बंद असलेल्या गिरण्या लवकरात लवकर सुरू करा,असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी प्रशासनाला केले आहे. सुळे यांनी इंदू मिल नंबर पाच ला भेट दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

देशातील आणि राज्यातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने केंद्र सरकारने अनलॉक तर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन म्हणत देशातील जवळपास सर्वच उद्योग सुरू केले आहेत. मात्र, अद्यापही एनटीसीच्या अंतर्गत देशभरात  बंद केलेल्या गिरण्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील हजारो कामगारांच्या हाताल काम नाही. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी मुंबईतील भायखळा येथील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या इंदू मिल नंबर 5 ला भेट दिली.

महत्त्वाची बातमी : शेतकऱ्यांना फायदा फक्त मोदी सरकारच्या काळातच झाला का? संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात एनटीएसी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्व गिरण्याही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, आता हळूहळू सर्वकाही पूर्व पदावर येत असून देशातील उद्योगक्षेत्र सुरू झाले आहे. पण, राज्यातील 5 आणि देशभरातील एकूण 23 गिरण्या बंद आहेत. त्यामुळे, या मिलमध्ये काम करणाऱ्या कायम आणि कंत्राटी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. सरकार गिरण्या कधी सुरू करणार? असा सवाल गिरणी कामगार विचारत आहे. या परिस्थितीचे गांभिर्यलक्षात घेऊन  खासदार सुळे यांनी भायखळा येथील एनटीसीच्या इंदू मिल नबंर 5 ला भेट देत येथील व्यवस्थापनशी चर्चा केली.

मुंबई परिसरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

लवकरात लवकर मिल सुरू करुन कामगारांचा प्रश्नी मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांच्याशीही आपण चर्चा केली असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

start nrc mills as soon as possible MP supriya sule

loading image