वाड्या वस्त्यांवर टॅंकर सुरू करा - निलम गोऱ्हे

संजय शिंदे
गुरुवार, 24 मे 2018

पालघर जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई वाढत आहे. यासाठी गावात व पाड्यांवर तत्काळ पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावेत अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली. आमदार गोऱ्हे सध्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागरिकांशी संवाद साधताना पाणी टंचाई  असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मुंबई : पालघर जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई वाढत आहे. यासाठी गावात व पाड्यांवर तात्काळ पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावेत अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली. आमदार गोऱ्हे सध्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागरिकांशी संवाद साधताना पाणी टंचाई  असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत गोऱ्हे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांना लेखी निवेदन देऊन जिल्ह्यातील पालघर मधील गोवेडे, डहाणूतील कांदरवाडी, देहारे, बोईसरमधील झाई, मोखाडामधील वाघ्याची वाडी, विक्रमगडमधील केवगावठण, केव हांबरेपाडा, मासवली रायगुणपाडा, गोनेगाव महाकालीपाडा, वेलपाडा, ग्रामपंचायत काचपाडा, आलूपाडा, कळंबपाडा या व आवश्यक असलेल्या गावात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर तत्काळ सुरु करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच पावसाची परस्थिती व्यवस्थित होईपर्यंत म्हणजे अंदाजे 15 जून पर्यंत पाणीपुरवठा टँकरने सुरु ठेवण्याची  मागणी या निवेदनाच्या द्वारे करण्यात आली आहे. याबाबत गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ नारनवरे व उपजिल्हाधिकारी संभाजी अडकूने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची आश्वासन गोऱ्हे यांना दिली आहे.
 

Web Title: start the tanker on rural and tribal area