मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई; दोघांना अटक | Manor crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested

मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई; दोघांना अटक

मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या (State excise department) भरारी पथकाने जव्हार तालुक्यातील खंबाळा-जव्हार रस्त्यावर बुधवारी चालतवड गावाजवळ विदेशी मद्याची बेकायदा (illegal selling of alcohol) वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईत ५६२ बल्क लिटर विदेशी मद्य आणि कार मिळून १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन आरोपींना अटक (two culprit arrested) करण्यात आली आहे. रमेश पांडू काकड व दौलत नामदेव फुपाणे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: नवी मुंबईत महिला असुरक्षित; दर दोन दिवसांत एका महिलेवर बलात्कार

चौकशीदरम्यान आरोपींच्या ताब्यात आढळलेला मद्यसाठा केंद्रशासित प्रदेश सिल्वासा-खानवेलच्या मांदुना येथील जानू नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला होता. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावच्या रीतेश गुणगुणे याला विकणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. जानू आणि रीतेश गुणगुणे यांना फरार घोषित करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: State Excise Department Arrested Two Culprits In Illegal Selling Of Alcohol Crime Manor News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..