
ठाणे : ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवानिर्मित विदेशी मद्य जप्त केले. ठाणे खारेगाव दरम्यान जप्त केलेल्या मद्याची किंमत १ कोटी ३६ लाख असून मोहम्मद समशाद सलमानी नामक वाहन चालकाला (ता.३) अटक केली आहे. जप्त केलेले बनावट मद्य १४०० पेट्यांमधून ठाणे, मुंबई विविध वाईन शॉपमध्ये विक्रीसाठी पाठवले जाणार होते. या गुन्ह्यामागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.