esakal | विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

केरळच्या कोझिकोडमध्ये नुकतीच भीषण विमान दुर्घटना घडली होती. यामध्ये वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून प्रवाशांना कोझिकोडमध्ये आणलं जात होतं

विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : केरळच्या कोझिकोडमध्ये नुकतीच भीषण विमान दुर्घटना घडली होती. यामध्ये वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून प्रवाशांना कोझिकोडमध्ये आणलं जात होतं. या भीषण दुर्घटनेत मुख्य पायलट आणि को पायलट यांच्यासोबत एकूण १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातले मुख्य वैमानिक विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर आज राज्यसरकारतर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांना अखेरचा निरोप दिला गेला. 

केरळच्या कोझिकोडमध्ये भीषण विमान दुर्घटना घडली होती. मुसळधार पावसामुळे टेबल टॉप धावपट्टीवरून विमान घसरून ते पुढे दरीत कोसळल्याने अपघात झाला होता. या विमानामध्ये एकूण १९१ प्रवासी होते. 

हेही वाचा : राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन


हेही वाचा :  काय सांगता! तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं, वाचा सविस्तर बातमी

कोण होते दीपक वसंत साठे ? 

  • दीपक वसंत साठे हे भारतीय वायुदलाचे पायलट होते. हवाई दलातील लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी सेवा दिली होती  
  • त्याचा प्रवास सुरु झाला पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी पासून.
  • NDA मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर ते १९८१ मध्ये भारतीय वायुदलात रुजू झालेत. 
  • मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, 'या' यादीत मिळवलं 'टॉप 5' मध्ये स्थान...१९८१ ते २००३ असा त्यांनाच भारतीय वायुदलात कार्यकाळ राहिला.
  • त्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झालेत.
  • दीपक वसंत साठे हे एअर फोर्स अकॅडमी प्रशिक्षणही अग्रेसर राहिलेत.
  • त्यांनी HAL म्हणजेच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये टेस्ट पायलटची अत्यंत कठीण भूमिकाही पार पडलीये   

state funaral for wing commander caption deepak sathe at vikroli mumbai