राज्य सरकारकडून केरळ सरकारला पत्र, पत्रास कारण की...

maharashtra and  kerala cm
maharashtra and kerala cm
Updated on

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. देशातील सर्वच राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी देशातील सर्वच राज्य सरकार आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची स्थिती पाहता कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा महाराष्ट्रात झालेला दिसतोय. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. त्यामुळे राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं केरळ सरकारला एक पाठवलं आहे. या पत्रात महाराष्ट्र सरकारनं केरळ सरकारकडे वैद्यकीय मदत करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील वाढता आकडा पाहता येथे उपचारासाठी अनुभवी डॉक्टर आणि नर्स पाठवण्याची मुख्यमंत्र्यांनी केरळ सरकारला विनंती केली आहे.

केरळने आपल्या प्रयत्नातून त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या पत्रात राज्य सरकारने केरळकडे 150 डॉक्टर आणि परिचारिका पुरवण्याची मागणी केली आहे. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.

काय म्हटलं आहे पत्रात: 

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भातलं पत्र केरळ सरकारला पाठवण्यात आलं आहे. महाराष्‍ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात भविष्‍यातही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. मुंबईतील महालक्ष्‍मी रेसकोर्स भागात 600 बेडचे कोविड 19 रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 125 बेडचे आयसीयूदेखील असेल. कोरोनाची मध्‍यम लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना येथे ठेवण्यात येईल. त्यामुळे सध्याची राज्यातील रुग्णालयातील स्थिती पाहता आम्हाला अधिक अनुभवी डॉक्टर तसेच नर्सची गरज आहे. सध्या खासगी डॉक्टरही काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त नर्स तसेच डॉक्टरांची गरज आहे.

राज्य सरकार देणार वेतन:

या तात्पुरत्या रुग्णालयाची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार आहेत. स्पेशालिस्ट डॉक्टरांना म्हणजेच एमडी अथवा एमएस डाक्टरांना महिन्याला दोन लाख रूपये, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार रूपये आणि नर्सना 30 हजार रूपये मासिक वेतन दिलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही परिस्थिती पाहता आम्हाला अधिकच्या डॉक्टर तसंच नर्सची आवश्यकता भासण्याची शक्यता असल्याचं सरकारच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर आणि कोविड 19चे नोडल ऑफिसर डॉ. टी पी लहाने म्हणाले. तसंच याबाबतच आम्ही केरळमधील डॉक्टरांशी चर्चा केली असून केरळने आम्हाला मदत देऊ केली आहे. आम्ही त्यासाठी अधिकृत पत्रही पाठवले असल्याचं लहाने यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद: 

गेल्या आठवड्यात केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांच्याशी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी दोघांमध्ये कोरोना व्हायरसचा सामना कशा पद्धतीनं केला जात आहे, यावर चर्चा केली.

state governemet wrote letter for medical help to kerala read ful story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com