

MMRDA Orange GAte Project
ESakal
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पूर्व मुक्त महामार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह असा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ५७ कोटींचे दुय्यम कर्ज देण्यास नगरविकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली. याशिवाय ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी बिनव्याजी १५३ कोटी देण्यात येणार आहे.