Water Project: 'जलजीवन'ला बूस्टर डोस! २२,८९८ कोटींचा अतिरिक्त निधी, राज्य सरकारचा निर्णय

Jal Jeevan Mission Project : राज्य सरकार जलजीवन मिशनच्या प्रकल्पांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रकल्पांना गती मिळणार आहे.
Water supply

Water supply

esakal
Updated on

मुंबई : निधीअभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने राज्याच्या तिजोरीतून तब्बल २२,८९८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अनुदानातील राज्याच्या हिश्श्याव्यतिरिक्त हा निधी देण्यात येणार असून, महत्त्वाच्या कामांच्या खर्चाबरोबरच अंतिम टप्प्यात येऊन रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी हा निधी आहे. विशेष म्हणजे अनेक महिने मागणी करूनही केंद्राच्या हिश्श्याचा निधी राज्याला मिळत नसल्याने केंद्राकडून निधी येण्यापूर्वीच राज्याकडून आगाऊ निधी वितरित करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com