मुंबईतील लष्करी हस्तक्षेपाला राज्य सरकारचा नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील लष्करी हस्तक्षेपाला राज्य सरकारचा नकार

लॉकडाऊन करूनही नागरिक बधत नाहीत, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी व आरोग्य यंत्रणेला कोरोनावर मात करता यावी यासाठी मुंबईत लष्कर पाठवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता, परंतु राज्य सरकारला मुंबईत लष्कराचा हस्तक्षेप नको असल्याने केंद्र सरकारला नकार कळवला आहे.

मुंबईतील लष्करी हस्तक्षेपाला राज्य सरकारचा नकार

मुंबई : लॉकडाऊन करूनही नागरिक बधत नाहीत, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी व आरोग्य यंत्रणेला कोरोनावर मात करता यावी यासाठी मुंबईत लष्कर पाठवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता, परंतु राज्य सरकारला मुंबईत लष्कराचा हस्तक्षेप नको असल्याने केंद्र सरकारला नकार कळवला आहे. त्यामुळे मुंबईकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या लष्कराच्या तुकड्या आता येणार नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

ही बातमी वाचली का? अन्न-पाण्याविना 'ते' सोडतायेत जीव; सुरक्षा रक्षकाला अश्रू अनावर

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. वरळी, धारावी, जोगेश्‍वरी, पवई, भायखळा, डोंगरी, ग्रॅंट रोड, सांताक्रूझ, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, मालाड, दादर, कांदिवली या भागांत सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचे भय वाढत आहे. शनिवारी (ता. 11) धारावी, पवई आणि जोगेश्‍वरी या भागांत पोलिसांनी लॉंग मार्च काढला. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी भाजीपाला बाजार बंद करूनही गर्दी कमी होत नाही. वाढत्या गर्दीचे कारण देत आमदार आणि मंत्री वर्षा गायकवाड यांनी धारावीत लष्कर बोलावण्याची मागणी केली होती. 

ही बातमी वाचली का? मुंबई महापालिकेकडून डायलिसीससाठी पाच केंद्रे  

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि लखनऊ या दोन शहारांत लष्कर तैनात करण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. केंद्राने लष्कराला तशा सूचनाही दिल्या होत्या. मुंबईतील धारावी, रे रोड, मोहम्मद अली मार्ग, धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर आणि ठाण्यातील भिवंडी या भागांत लष्कर तैनात केले जाणार होते. त्यासाठी लष्कराने तयारीही केली होती, परंतु लष्कराच्या तुकड्या मुंबईत पाठवण्याचा विचार अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.

ही बातमी वाचली का? मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार

एकेकाळी केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेले भाजप आणि शिवसेना हे पक्ष वेगळे होऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. लष्कर तैनातीच्या निमित्ताने केंद्राचे मुंबईवर वर्चस्व निर्माण होईल, ही भीती राज्यातील सत्ताधाऱ्यांना वाटत असावी. मुंबई लष्कराच्या ताब्यात गेल्यास राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारही जातील. त्यामुळेच राज्य सरकारने लष्कराला नकार दिल्याचे समजते.

टॅग्स :Shiv Sena