

Road Safety Funds by municipal corporation
ESakal
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पातील किमान एक टक्का निधी रस्ता सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि जनजागृती उपक्रमांसाठी राखून ठेवण्याचे निर्देश आज राज्य सरकारने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या सूचनांनुसार हे निर्देश देण्यात आले आहेत.