Nashik Police
sakal
मुंबई : मुंबई पोलिसांसाठी शहरात ४५ हजार निवासस्थाने उपलब्ध करून देणाऱ्या टाउनशिप प्रकल्पासाठी राज्य शासनाने शुक्रवारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती शहरातील ७५ भूखंडांवर टाउनशिप उभारण्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणार आहे.