'पनवेल-कर्जत'साठी वनजमीन वर्ग, रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण; राज्य सरकारचे आदेश जारी

Panvel-Karjat Railway: पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पासाठी ९.१३२१ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा शासन आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.
Panvel Karjat rail corridor

Panvel Karjat rail corridor

ESakal

Updated on: 

मुंबई : पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील ९.१३२१ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा शासन आदेश राज्य सरकारने शुक्रवारी (ता. ३०) जारी केला आहे. या प्रकल्पाचे काम सुमारे ९९ टक्के पूर्ण झाले असताना हा आदेश काढण्यात आला आहे. केंद्र सरकारने या वनजमिनीच्या वळतीकरणाला ११ नोव्हेंबर २०२५ला अंतिम मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने वनजमीन वळतीकरणाचा आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...