
Smart Parking system
ESakal
मुंबई : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम वाहतूक कोंडी कमी करणार असून, यामुळे पर्यटकांना सुलभ आणि सुखद अनुभव घेता येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या कोल्हापूरमध्ये, विशेषतः नवरात्रोत्सवातील भाविक आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.