

Ghodbunder road construction
ESakal
भाईंदर : घोडबंदर ते गायमुख रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पेलवत नसल्याने हा रस्ता राज्य सरकारकडे हस्तांतर करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी घेतला होता; मात्र या निर्णयात बदल करत हा रस्ता महापालिकेकडेच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, देखभाल दुरुस्तीचा खर्च मात्र राज्य सरकारच्या खांद्यावर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.