esakal | सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे

सदर पत्र पाठवताना राज्य सरकारकडून रेल्वेला ट्रेन्सची संख्या देखील वाढवण्याची विनंती केली गेली आहे.

सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून  महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेला तसं पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून सर्व सामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा विचार केला जातोय. कोरोनाच्या नियमांचा वापर करत ट्रेन्स सुरु करायच्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून रेल्वेला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. 

महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

काय म्हटलंय पत्रात :   

कोरोना काळात राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी ट्रेन्स सुरु करण्याबाबत विचार करत आहे. रेल्वे सुरु करताना टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरु करण्यात येतील. त्यासाठी रेल्वेकडून काही टाइमस्लॉट्स रेल्वेला सूचित करण्यात आले आहेत.  

  • सकाळची पहिली लोकल ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत : ज्यांच्याकडे अधिकृत तिकीट किंवा पास आहे अशा सर्वांना रेल्वेतून परवानगी देण्यात यावी 
  • सकाळची ८.०० ते सकाळी १०.३० : अत्यावश्यक सेवेतील अधिकृत QR कोड आणि अधिकृत पास किंवा तिकीट असलेले नागरिक
  • सकाळी ११.०० ते दुपारी  दुपारी ०४.३० : ज्यांच्याकडे अधिकृत तिकीट किंवा पास आहे अशा सर्वांना रेल्वेतून परवानगी देण्यात यावी 
  • संध्याकाळी ०५.०० ते संध्याकाळी ०७.३० : अत्यावश्यक सेवेतील अधिकृत QR कोड आणि अधिकृत पास असलेले नागरिक
  • रात्रौ ०८.०० ते शेवटची ट्रेन : ज्यांच्याकडे अधिकृत तिकीट किंवा पास आहे अशा सर्वांना रेल्वेतून परवानगी देण्यात यावी
  • महिलांसाठी दर तासाला एक महिला स्पेशल ट्रेन  

महत्त्वाची बातमी :  राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

सदर पत्र पाठवताना राज्य सरकारकडून रेल्वेला ट्रेन्सची संख्या देखील वाढवण्याची विनंती केली गेली आहे. आता यावर रेल्वेकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणं आहे.  

state government writes letter to railways to start local trains for all commuters

loading image
go to top