esakal | पनवेलच्या मनाली जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पनवेलच्या मनाली जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : भरतनाट्यम नृत्य या कला विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून आर्ट बिटस् फाऊंडेशनकडून तो ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहे. भरतनाट्यम सादरीकरणाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पनवेलच्या मनाली सचिन जोशी (उपाध्ये) या गेली १० वर्षे भरतनाट्यम साधना करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना नटरंग कला अकादमीतर्फे भरतनाट्यमचे प्रशिक्षण देत आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्या करत असून, याच कार्याची दखल घेत आर्ट विटस् फाऊंडेशन पुणे या संस्थेचे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

हेही वाचा: नागरिकरणातील तज्ज्ञ आणि `मशाल’ संस्थेचे संस्थापक शरद महाजन यांचे निधन

पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले, आर्ट बिटस् ही संस्था गेली २० वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

loading image
go to top