प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक्‍स्प्रेस आणि लोकलचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक्‍स्प्रेस आणि लोकलचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या धोक्यानंतरही ...'या' रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरीची सक्ती!

रेल्वेगाडीत एखादा कोरोनाचा रुग्ण असल्यास इतर प्रवाशांना लागण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने यार्डातच एक्‍स्प्रेस आणि उपनगरी गाड्यांचे निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. हॅंडल्स, वॉश बेसिन व प्रवाशांच्या हातांचा संपर्क येणाऱ्या वस्तूचे निर्जंतुकीकरण केले जात अाहे.

ही बातमी वाचली का? कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा 'ही' शिक्षा!

वातानुकूलित डब्यात उशा-ब्लॅंकेट नाहीत
एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातील सर्व उशा, ब्लॅंकेट आणि पडदे काढण्यात येणार आहेत. प्रवाशांनी स्वतःच्या सोईसाठी प्रवास करताना ब्लॅंकेट आणि उशा सोबत घ्याव्यात, असे आवाहन मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sterilization begins in the Central-Railway Local-Express