भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी 10 पिंजरे

दिनेश गोगी
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

उल्हासनगर : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर मात करण्यासाठी किंबहूना संख्या नियंत्रणात आणण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची सुरवात सोमवार किंवा मंगळवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 पिंजरे तयार असून श्वानांना ठेवण्याची-ऑपरेशनची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजा रिजवानी यांनी दिली.

पालिकेच्या मागे असलेले पूर्वीचे जकात नाक्याचे प्रमुख कार्यालय ओस पडलेले होते. आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशान्वये या कार्यालयाची निर्बीजीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. निर्बीजीकरणाचा कंत्राट हैदराबादच्या संस्थेला देण्यात आलेला आहे. कार्यालयात एकीकडे पकडून आलेल्या भटक्या कुत्र्यांना ठेवण्याची-ऑपरेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे डॉक्टर कर्मचारी यांच्या राहण्याचा देखील बंदोबस्त केलेला आहे. 10 पिंजऱ्यात प्रत्येकी दोन असे 20 कुत्रे ठेवले जाणार आहे. पकडून आणल्यावर त्यांना एक दिवस पोटभर जेवण दिल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे.

निर्बीजीकरण झाल्याचे प्रमाण म्हणून कुत्र्यांचा कानावर व्ही आकारचे निशाण नमूद केले जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी ज्या परिसरातून पकडून आणले तिथे सोडले जाणार आहे. हैदराबादच्या कंपणीला प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे अडीच हजार कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा कंत्राट 25 लाख रुपयात देण्यात आला असल्याचे डॉ. राजा रिजवानी यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

Web Title: Sterilization for street dog