Mumbai : लस घेण्यास अद्यापही मरगळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 covid vaccine

लस घेण्यास अद्यापही मरगळ

मुंबई : राज्य सरकारने आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने प्रत्येकाला लस मिळावी, यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली आहे; मात्र या मोहिमेलाही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यात दररोज १० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या दोन आठवड्यात राज्यात लसीकरणाची संख्या तीन महिन्यांच्या कालावधीतील नीचांकी असल्याचे समोर आले. त्यामुळे येत्या दोन आठवड्यांत सर्व पात्र लोकसंख्येचे एकाच वेळी लसीकरण करण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान केवळ १३.८८ लाख लोकांना लस देण्यात आली; तर ६ ते १२ नोव्हेंबरदरम्यान २७.२ लाख जणांना लस देण्यात आली. हे प्रमाण गेल्या ११ आठवड्यांमधील सर्वात कमी आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

प्रत्येकाला लस देण्यासाठी आम्ही दारोदारी जाण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यापासून साडेचार ते पाच लाखापर्यंत लसीकरणाची संख्या वाढली आहे. शनिवारी सात लाख लसीकरण झाले होते. आरोग्य यंत्रणेचा प्रतिदिन १० लाखाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण कार्यक्रमाचे अधिकारी.

loading image
go to top