मुंबईत बेस्ट बसवर दगडफेक; तीन आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

बेस्ट बसवर दगडफेक करत बसला तोडफोड केल्याच्या आरोपावरून एका टॅक्सी चालक सोबत दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबईत बेस्ट बसवर दगडफेक; तीन आरोपी अटकेत

मुंबई - दहिसर पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी रात्री बेस्ट बसवर दगडफेक करत बसला तोडफोड केल्याच्या आरोपावरून एका टॅक्सी चालक सोबत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत बस चालक आणि प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर, सोमवारी रात्री 9.35 च्या सुमारास बेस्ट बस मार्ग क्रमांक 705 दिंडोशी बस आगारातून काशिगाव मीरा रोडकडे निघाली आणि वाहतूक कोंडीमुळे टॅक्सी चालकासोबत बस चालकशी हुज्जत झाली.

टॅक्सीतून तीन प्रवासी प्रवास करत होते. टॅक्सीने बसचा मार्ग रोखला आणि रमेश पवार या बस चालकावर कथितपणे हल्ला केला. तसेच बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेक झाल्यामुळे बसचे नुकसान झालेच परंतु बसचालक पवार आणि दोन प्रवासी जखमी झाले.दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बेस्ट बस चालकाच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून टॅक्सी चालक समीर सुर्वे याच्यासह दोघांना अटक केली आहे.या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे.'