बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण थांबवा

चेंबूर ः बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण त्वरित थांबवण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी कामगार.
चेंबूर ः बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण त्वरित थांबवण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी कामगार.

चेंबूर : चेंबूर येथील माहुल परिसरातील बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण त्वरित थांबवण्यात यावे; तसेच चारपैकी विक्रीस काढलेल्या तीन रिफायनरींची विक्री त्वरित थांबवावी, यासह विविध मागण्यांकरिता बीपीसीएलच्या कामगारांनी गुरुवारी संप करीत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला.

काळे कपडे घालून व हातात काळे झेंडे घेतलेल्या हजारो कामगारांनी माहुल ते चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत पायी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. बीपीसीएलमधील विविध संघटनांचे ४ हजारांहून अधिक पदाधिकारी व कामगार या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकारने बीपीसीएलमधील स्वतःची एकूण ५३.३ भागीदारी खासगी कंपनीला विकत कंपनीचे व्यवस्थापन व नियंत्रणदेखील खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा कामगारांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर विपरीत परिणाम होणार आहे.

भारतातील इंधन बाजारात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाग आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल या तीन सार्वजनिक कंपन्यांकडे असल्याने इंधनाच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे सरकारला शक्‍य होत आहे. मात्र केंद्र सरकार या कंपन्यांचे खासगीकरण करून मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

या कंपन्या अदानी व रिलायन्स तसेच अन्य विदेशी कंपन्यांच्या घशात न घालता, सरकारने कामगारांचे हित जोपासण्याची मागणी कामगारांनी केली आहे. माहुल येथील बीपीसीएल कंपनीच्या मुख्य दरवाजा समोरून सकाळी ८ वाजता सुरू झालेला मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाजवळ दुपारी १२ वाजता येऊन त्याचे सभेत रूपांतर झाले.

... तर देशव्यापी तीव्र आंदोलन करू!
बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण त्वरित थांबवण्यासोबतच अन्य विविध मागण्या मान्य न केल्यास देशव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी संपात सहभागी झालेल्या संघटनांनी दिला आहे. या वेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, बीपीसीएल कामगार संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र राऊत, अशोक माहुलकर, प्रकाश राणे, सुधाकर घाग, किशोर नायर, प्रताप शेट्टी, सुनील पवार, संदीप उनकुळे, प्रवीण बोर्डेकर, बाबी पवार तसेच कामगार सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com