मेगाब्लॉकची वेळ संपल्यानं गर्डर लॉचिंगच्या कामाला थांबा, केवळ १० टक्के काम बाकी

रविंद्र खरात
Sunday, 22 November 2020

कल्याणमधील नवीन पत्रीपूल गर्डर लॉचिंग करण्याच्या काम दुसऱ्या दिवशी सुरू झाले. मात्र मेगाब्लॉक कालावधी संपल्याने लॉचिंग करण्याचे काम थांबले असून रेल्वेने आणखी एक तासांचा मेगाब्लॉक द्यावा अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे केली आहे.

मुंबईः कल्याणमधील नवीन पत्रीपूल गर्डर लॉचिंग करण्याच्या काम दुसऱ्या दिवशी सुरू झाले. मात्र मेगाब्लॉक कालावधी संपल्याने लॉचिंग करण्याचे काम थांबले असून रेल्वेने आणखी एक तासांचा मेगाब्लॉक द्यावा अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे केली आहे.

कल्याणमधील बहुचर्चित नवीन पत्रीपूल गर्डर लॉचिंग करण्याचे काम शनिवारी सुरू झाले होते. मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रत्येकी चार तास असे एकूण आठ तासांचा मेगाब्लॉक दिला होता. रविवारी म्हणजेच आज सकाळी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकामध्ये उद्यान एक्सप्रेसचे इंजिन बिघाड झाल्याने मेगाब्लॉक उशिरा सुरू झाला. कल्याण रेल्वे स्थानकामधून 9 वाजून 50 मिनिटाला पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने सोडल्यानंतर मेगाब्लॉक सुरू करण्यात आला. 10 वाजून 30 मिनिटाला दुसऱ्या दिवसाचे नवीन पत्रीपूल लॉचिंगचे काम सुरू झाले. 

गर्डर लॉचिंग करताना प्रति फुटाला गर्डर चेकिंग केली जाते. आज काही तांत्रिक अडचणी दूर करताना मेगाब्लॉक कालावधी संपताच काम थांबवण्यात आले. मेगाब्लॉक कालावधी संपताच कल्याण रेल्वे स्थानकमधून बदलापूर लोकल 1 वाजून 55 मिनिटाला मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली. गर्डर लॉचिंग करण्याचे काम 18 मीटर बाकी असताना काम थांबविण्यात आले असून अजून एक तासाचे मेगाब्लॉक हवा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. पुढील काम केले जाईल अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली.

अधिक वाचा-  मुंबईत कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक? कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

आज दिलेल्या कालावधीत 47 मीटर गर्डर लॉचिंग करायचा होता. हे काम करताना घाई करून चालत नाही. 30 मीटरचे काम पूर्ण झाले असताना मेगाब्लॉक कालावधी संपला. आता 18 मीटर लॉचिंग करण्याचे काम बाकी आहे. रेल्वेशी चर्चा सुरू आहे आणखी मेगाब्लॉक मिळताच पुढील काम करू यात आज अर्धा तास काम उशिरा सुरू झाले तर 27 ते 29 या कालावधीत दिलेल्या मेगाब्लॉकमध्ये उर्वरित काम केले जाईल अशी माहिती रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी दिले. आता रेल्वे काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा-  भारती सिंग पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही NCBकडून अटक, 18 तास चौकशी

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Stop working girder launching megablock over only 10 per work left Patripool


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop working girder launching megablock over only 10 per work left Patripool