चक्क मगरींमुळे पूलदुरुस्ती थांबली

दादली पूलाला जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे.
दादली पूलाला जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे.

महाड : तालुक्यातील सावित्री नदीवरील दादली पूलाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती सुरू करण्यात आली होती. परंतु नदीतील मगरी आपल्यावर हल्ला करतील या भीतीमुळे कामगारांनी दुरुस्तीस नकार दिला आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे. अखेर कामगारांच्या भीतीची दखल घेत कंत्राटदाराने मगरींपासून संरक्षण व्हावे यासाठी पुलाखाली लोखंडी जाळ्या बसवण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने महाड तालुक्‍यातील दादली पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ ते ५ डिसेंबरदरम्यान काम सुरू केले. त्यासाठी तो वाहतुकीसाठीही बंद करण्यात आला होता; परंतु अवघ्या एका दिवसातच तो खुला करण्यात आला. यामुळे नागरिक आणि वाहनचालकदेखील संभ्रमात पडले.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधल्यानंतर सत्य समोर आले. त्यानुसार हा पूल ज्या नदीवर बांधण्यात आला आहे, त्या सावित्री नदीत मगरींचा वावर आहे. त्यामुळे त्यांची दहशत आहे. या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या कामगारांनीही काम करण्यास नकार दिला. अखेर नदीतील मगरींपासून बचाव करण्यासाठी पुलाखाली संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे.

महामार्गावरूनही सहज दर्शन 
महाड शहराला वळसा घातलेल्या सावित्री नदीत मगरींचा वावर वाढला आहे. केंबुर्ली येथे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही त्यांचे दर्शन घडते. त्या केंबुर्लीसह, दादली पूल, गांधारी पूल आदी परिसरात दिसतात.

दादली पूल दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद ठेवला जाणार होता; मात्र एक दिवस काम केल्यानंतर मगरींपासून कामगारांचा बचाव करण्यासाठी पुलाखाली सरंक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
- एस. व्ही. पठाडे, 
उपअभियंता, बांधकाम विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com