मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांमागचा रंजक इतिहास

स्थानकांची नेमकं नावं कशी उदयाला आली हे फार कमी जणांना माहित आहे.
 railway station
railway station

मुंबईची (mumbai) लाईफलाईन म्हटलं की वाऱ्याच्या वेगाने धावणारी लोकल (mumbai local) गाडी डोळ्यासमोर येते. दिवसरात्र प्रवाशांचा भार वाहून नेणारी लोकल सेवा गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे आपली सेवा बजावत आहे. गाव आणि शहर यांना जोडणारा हा सर्वोत्तम आणि स्वस्तातील मार्ग म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गावर प्रवास करतांना लोकल खचाखच गर्दीने भरुन जाते. प्रत्येक स्थानकावर गर्दीचा लोंढा लोकलमध्ये शिरत असतो. विशेष म्हणजे आता कोणत्या स्थानकावर किती गर्दी होणार हेदेखील रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठावूक झालं आहे. परंतु, गाडी ज्या स्थानकांवर थांबते त्या स्थानकांची नेमकं नावं कशी उदयाला आली हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच, मुंबईतील काही खास स्थानकांची नावं नेमकी कशी उदयाला आली ते पाहुयात. (stories behind stations mumbai local station names)

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -

मुंबईची शान म्हणून या स्थानकाकडे पाहिलं जातं. मुंबईतील प्रशस्त आणि भव्य असलेल्या या स्थानकात केवळ शहरच नव्हे तर अनेक राज्यांसाठीच्याही पॅसेंजर, मेल चालवल्या जातात. या स्थानकाचं नाव प्रथम बोरीबंदर होतं असंही म्हटलं जातं. त्यानंतर ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णमहोत्सव सुरु होता. म्हणजे ५० वर्ष झाली होती. व्हिक्टोरिया टर्मिनस या इमारतीचं नाव बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस असं ठेवण्यात आलं. १९९६ मध्ये पुन्हा एकदा या स्थानकाचं नामांतर झालं आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं.

२. चर्चगेट -

पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचं स्थानक. ज्याप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी स्थानक आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आहे. फ्लोरा फाऊंटनजवळ सेंट थॉमस कॅथड्रल नावाचं एक चर्च होतं. त्या चर्चवरुनच या स्थानकाचं नाव चर्चगेट ठेवण्यात आलं आहे.

 railway station
किती ती हौस; मास्कवर घातले दागिने

३. करी रोड -

मुंबईमधील करी रोड या स्थानकाचं नाव सी. करी यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. १८६५ ते १८७५ या काळात देशात जीआयपी, बीबीसीआय रेल्वे कंपन्यांच्या देखरेखीची जबाबदारी सी. करी यांच्यावर होती. त्यामुळेच त्यांच्या नावावरुन पुढे या स्थानकाला करी रोड असं नाव देण्यात आलं.

४. भायखळा -

असं म्हटलं जातं की, या ठिकाणी पूर्वी धान्याची गोदामं होती. या गोदामांचा मालक भाया होता. त्यामुळे भायाचे खळे असं म्हटलं जायचं. पुढे पुढे अपभ्रंश होऊन भायखळे व भायखळा असं झालं. त्यानंतर १८५८ मध्ये ब्रिटीशांनी भायखळा स्थानकाची उभारणी केली.

५. दादर -

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकमेव दुवा म्हणजे दादर. या स्थानकामधून मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवास सहज करता येतो. आज हे स्थानक विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे. दादरमधून जाणाऱ्या रेल्वे रुळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी व पादचारी लोकांसाठी एक पूल बांधण्यात आला. या जिन्याला म्हणजेच पूलाला दादर असं म्हटलं जात. त्यावरुनच या स्थानकाच नाव दादर असं ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातं.

६. घाटकोपर -

मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या या स्थानकावर आता मेट्रो सेवादेखील सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात आता सहज प्रवाशांना जाता येतं. गजबजलेल्या स्थानकांपैकी एक म्हणूनही घाटकोपरकडे पाहिलं जातं. घाटाच्या वरती हे गाव वसल्यामुळे त्याला घाटकोपर म्हटलं जातं. परंतु, हेच नाव प्रचलित झालं.

७. ग्रँट रोड -

पूर्वीच्या काळी सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्याकाळी ग्रँट रोडचा परिसर अत्यंत ओसाड होता. त्यामुळे या भागात नवीन रस्ते बांधून रॉबर्ट ग्रँट यांनी तो गिरगावला जोडला. त्यामुळे त्यांच्या गौरवार्थ या स्थानकाला ग्रँट रोड असं नाव देण्यात आलं.

८. विले पार्ले -

खरं तर हे नाव विले पावडे या पोर्तुगीज नावावरुन आलं आहे. विले म्हणजे वसाहत व पावडे म्हणजे झोपडी. पूर्वी येथे राहणाऱ्या काही लोकांच्या वसाहतींना विले पावडे म्हटलं जायचं. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन ते विले पार्ले झालं असं म्हटलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com