esakal | अरे वाह! दुबईत अडकून पडलेले तब्बल 'इतके' श्रमिक महाराष्ट्रात दाखल; उद्योजक धनंजय दातार यांची मदत..  
sakal

बोलून बातमी शोधा

vande bharat mission dubai

कोरोनाचा फैलाव व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या 186 श्रमिकांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे महाराष्ट्रात परत येता आले. 

अरे वाह! दुबईत अडकून पडलेले तब्बल 'इतके' श्रमिक महाराष्ट्रात दाखल; उद्योजक धनंजय दातार यांची मदत..  

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई: कोरोनाचा फैलाव व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या 186 श्रमिकांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे महाराष्ट्रात परत येता आले. 

दुबईत रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले हजारो भारतीय अद्यापही तेथेच अडकून पडले आहेत. त्यातील श्रमिकांना दातार यांनी स्वखर्चाने भारतात पाठवले. यापुढेही तेथील भारतीयांना परत जाण्यासाठी अशीच मदत केली जाईल, असेही दातार यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा: अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

या 186 मराठी कामगारांचा रोजगार गेल्याने त्यांची आर्थिक स्थितीही बिकट झाली होती. तसेच त्यांना निवाराही गमावण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्यांच्या परतीचा खर्च दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने केला, त्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली.  

संयुक्त अरब अमिरातीतून भारतात विमान वाहतूक यापूर्वीच सुरु झाली, मात्र दुबई ते मुंबई अशी विमानसेवा सुरु होण्यास उशीर लागला. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास पासष्ट हजार लोक दुबईत अडकून पडले होते. त्यात गरीब श्रमिकांची संख्या मोठी असल्याने प्रथम त्यांना स्वखर्चाने मायदेशी पोहोचविण्याची मोहीम अल अदील कंपनीने हाती घेतली. 

त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा खर्चही कंपनीनेच केला. याआधीही लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हजारो गरजू कुटुंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते. केरळ, तमीळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील तीन हजारांहूनही अधिक गरजू प्रवाशांना भारतात पोहोचविण्यासाठी कंपनीने तीन कोटी रुपये खर्च केले. 

हेही वाचा: मद्यविक्रेते म्हणतायत, "नाहीतर आमचंही शटर होईल कायमचं डाऊन", असं झालं तर तळीरामांची चिंताही वाढेल

या देशवासियांना परत पाठविण्यासाठी परवानेविषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सचे श्री. सुलेमान यांची मदत झाली. अजूनही ज्या गरजूंना अर्थसाह्याची गरज आहे त्यांनी स्वतः किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. दातार यांनी केले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

stranded labors in dubai came to maharashtra