अजबच...! दुकान किराणाचं अन् विकतोय भलतंच काही, मग काय आलं अंगलट

kiranas
kiranas

नवी मुंबई : किराणा दुकानातून बेकायदा विदेशी मद्य विक्री करणाऱ्या किराणा दुकानमालकाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत किराणा मालाच्या दुकानातून हजारो रुपये किंमतीचा मद्यसाठा देखील जप्त केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन  असतानाही एक व्यक्ती तळोजा फेज-2 मधील एका किराणा दुकानातून अवैध मद्य विक्री करत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाईसाठी तळोजा पोलिसांचे पथक गत रविवारी दुपारी सव्वा एक वाजता तळोजा फेज-2 मधील मन्नत सोसायटीतील किराणा दुकानाजवळ गेले होते. यावेळी किराणा दुकानातील सचिन बुधाजी रासकर (44) याला पोलिसांचा संशय आल्याने त्याने दुकानातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आदित्य सुपर मार्केट या किराणा दुकानाचा मालक असल्याचे सांगून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली असता, दुकानातील फ्रिजच्या पाठीमागील बाजूला असलेल्या बॉक्समध्ये विविध प्रकारचे विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. यावरुन सचिन हा किराणा दुकानातून बेकायदा मद्याची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

Strange in grocery store selling illegal alcohol, read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com