shiv sena with mns
sakal
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खेळलेला राजकीय डाव अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. कोकणभवन येथे बुधवारी शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांनी अधिकृत गट स्थापन केला. त्याचवेळी मनसेच्या पाच नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करीत थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात शिंदेंचे पारडे अधिक जड झाले आहे.