मराठी बाण्याच्या शिवसेनेची धुरा 'बिहारी'कडे

Shivsena
Shivsena

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची रणनिती आखून यश मिळवून देणारे निवडणूक प्रचार तज्ज्ञ प्रशांत किशोर आता मराठी बाणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या प्रचाराची धुरा संभाळणार आहेत. 

आज (मंगळवार) मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी शिवसेनेच्या प्रचार रणनितीचे सादरीकरण केले. सोशल मिडीया व डिजीटल प्रचाराची संपुर्ण जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टाकली आहे. भाजपच्या जल्लोषपुर्ण प्रचाराला तोडीस तोड देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून त्यासाठी रणनितीकार प्रशांत किशोर यांना पाचारण केल्याचे मानले जाते. 

2014 च्या लोकसभा निवडणूकांत भाजपने मिळवलेल्या विजयामध्ये प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी प्रचार रणनितीचे काम केले व यश मिळवले. आता ते नितीश कुमार यांच्या पक्षाचे महासचिव आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com