नवी मुंबईतही मांजरांची नसबंदी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही मोकाट मांजरांची नसबंदी करण्याचा विचार पालिकेचा आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा आहे. या केंद्रासाठी जागेची पाहणीही सुरू आहे. 

नवी मुंबई - मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही मोकाट मांजरांची नसबंदी करण्याचा विचार पालिकेचा आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा आहे. या केंद्रासाठी जागेची पाहणीही सुरू आहे. 

नवी मुंबईत झालेल्या १९ व्या पशुगणनेनुसार ३० हजार पाळीव, भटके प्राणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून मांजरांचे प्रमाण वाढल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागामार्फत वर्तवला जात आहे. तसेच मानवी वस्तीजवळच आढळणाऱ्या मांजरांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली. 

घुशी आणि उंदीर हे खाद्य प्रिय असणाऱ्या मांजरी भटक्‍या श्‍वानांपेक्षा आक्रमक नाहीत. मात्र लहान पिल्ले इमारतींमधील जिन्यात अथवा अडगळीच्या जागेत घेऊन त्या बसतात. अशा वेळेस त्यांच्यावर पाय पडल्यास मांजरीकडून हल्ला होण्याची भीती असते. अन्य तक्रारीही नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. त्यामुळे मांजरांची नसबंदी करण्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या विचाराधीन आहे. 

पकडणार कसे?
मांजर हा प्राणी अतिशय शांत असले तरी ते फार चपळ म्हणून त्याची ओळख आहे. अगदी चालता चालता पाच फुटांवर झेप घेण्याची क्षमता, तीक्ष्ण नखे आणि अचानक आक्रमक होण्याच्या स्वभावामुळे श्‍वान पकडणाऱ्या पालिकेच्या पथकासमोर मांजर पकडणे एक आव्हान आहे.

मांजरांच्या चावण्याच्या अथवा त्यांच्याकडून इजा पोहचवल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. मात्र मांजरांपासून त्रास होत असल्याच्या तक्रारी  विभागाकडे आल्या आहेत. अशा परिस्थितीत मांजरांची नसबंदी करण्याचे प्रशासनाच्या विचाराधिन आहे.
- डॉ. वैभव झुंझारे, पशुवैद्यकीय अधिकारी, पालिका 

Web Title: stray cat issue in navi mumbai