भटक्‍या कुत्र्यांची नवी मुंबईत दहशत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

तुर्भे - नवी मुंबईत भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांचे चावे घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याबाबत महापालिका उदासीन असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात फारसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. 

ही भटकी कुत्री वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाली आहे. महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली; पण त्यात कधीच फारसा रस घेतला नाही. परिणामी, कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. शहरातील कचराकुंड्या, मटण, चिकनची दुकाने, हॉटेल आदी परिसरांत भटक्‍या कुत्र्यांच्या झुंडी असतात. एखाद्याच्या हातात काळी पिशवी दिसली की, ते त्याच्या मागे लागतात. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्यांचा तर घरी पोहोचेपर्यंत जीवात जीव नसतो. इतका या भटक्‍या कुत्र्यांचा नागरिकांनी धसका घेतला आहे.

Web Title: street dogs in Navi Mumbai panic