आठवलेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइं रस्त्यावर

दिनेश गोगी
रविवार, 9 डिसेंबर 2018

उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्का दिला. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले असून उल्हासनगरात जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भगवान भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून या निषेध केला.

भालेराव यांच्या आवाहना नुसार व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवल्या. मात्र आज रविवार असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे नुकसान होऊ नये म्हणून भगवान भालेराव यांनी दुपारी 2.30 वाजता दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप यांनी रिपाइं प्रदेश सचिव नाना पवार, जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्यासोबत बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. शोभा जाधव, रामेश्वर गवई, शमशाद अली यावेळी उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे यांनी फर्स्ट गेट आनंद नगर येथे कार्यकर्यां सोबत बंदचे आवाहन केले. आधार प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप डोंगरे यांच्यासह सर्व थरातून या घटनेचा निषेध केला आहे. आठवले यांना धक्काबुकी करणाऱ्या प्रविण गोसावी याला जमावाने बेदम मारहाण केल्याने रात्री उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने गोसावीला जेजे मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांना धक्काबुकी करताना पोलिसांनाही धक्का देणाऱ्या प्रविण गोसावी याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद पोलीस नाईक पंढरी चव्हाण यांनी नोंदवली आहे. रात्रभर व दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप यांनी दिली.

Web Title: On the streets of RPI against attack on the Aathavale