esakal | वसईच्या 'या' भागात 24 जूनपासून कडकडीत लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याबाबत ग्रामस्थ आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचे प्रभाग समिती आयचे सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी सांगितले.

वसईच्या 'या' भागात 24 जूनपासून कडकडीत लॉकडाऊन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नालासोपारा : वसईच्या नायगाव-कोळीवाड्यात 24 जूनपासून पुढे 14 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याबाबत ग्रामस्थ आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचे प्रभाग समिती आयचे सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी सांगितले.

मोठी बातमी धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

नायगाव-कोळीवाड्यात मागच्या 8 ते 10 दिवसांत 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकाचा सोमवारी मृत्यू झाला. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासनाने तशी तयारी केली आहे. या परिसरात दाटीवाटीची लोकवस्ती, सुख-दुःखात एकत्र येणे, ओटीवर बसणे हे सर्व प्रकारही या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. 

महत्वाची बातमी : ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

नायगाव-कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द पूर्णपणे असणार सील आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Strict lockdown from June 24 in area of ​​Vasai read detail story