उद्यापासून ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन, म्हणून आज ठाणेकरांनी 'काय' केलंय वाचा..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

ठाण्यातील मुख्य बाजारपेठांत गर्दी, टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेने शहरात पुन्हा टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (ता.1) सकाळपासूनच शहरातील नागरिकांनी जांभळी नाका, नौपाडा, इंदीरानगर आणि सावरकरनगर परिसरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

1 जूननंतर टाळेबंदीत काहीशी शिथिलता आणताच ठाण्यातील रुग्णसंख्या झपाटयाने वाढू लागली. ही संख्या 8 हजाराच्या पार गेली असून मृतांची संख्याही अधिक आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने पुन्हा शहरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार गुरुवार (ता.2) पासून पुढील दहा दिवस ही टाळेबंदी असणार आहे.

मोठी बातमी - कोरोनाच्या पाश्वभूमीवर कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिक धास्तावलेत, उचलतायत 'हे' मोठं पाऊल...

याच पार्श्वभूमीवर ठाणेकरांनी बुधवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी अन्न-धान्यासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 

सोशल डिस्टंन्सिंगच्या फज्जा :

बाजारपेठांमध्ये सम आणि विषम नियमांनुसार एकाच बाजूची दुकाने सुरु असल्याने नागिरकांची गर्दी आणखीच वाढली. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा यावेळी पुरता फज्जा उडालेला दिसून आला. वाढलेल्या गर्दीमुळे पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणणेही शक्य होत नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

strict lockdown will be implemented in thane but thanekar gathered in markets


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strict lockdown will be implemented in thane but thanekar gathered in markets

Tags
टॉपिकस
Topic Tags: