सुशांतसिंहला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील; बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

तुषार सोनवणे
Friday, 11 September 2020

आज बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुशांतसिंह मृत्यू बाबत महत्वाचे विधान केले आहे.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण राजकीय मुद्दा झाला की काय असा प्रश्न सध्या पडला आहे. सुशांतसिंहचा मुद्दा आगामी बिहार निवडणूकांमध्ये गाजणार हे स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष हा मुद्दा निवडणूकीचा मुद्दा केला आहे. आज बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुशांतसिंह मृत्यू बाबत महत्वाचे विधान केले आहे.

हेही वाचा - डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; सरकारच्या धोरणांबाबत व्यक्त केला तीव्र संताप

फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य बिहारी जनतेची भावना स्पष्ट दिसत आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळायला हवा.यासाठी आम्ही म्हणत आहोत की, ना भूलेंगे ना भुलने देंगे. आम्हाला असं वाटतं की निवडणूकीचा मुद्दा नाही परंतु सुशांत बिहारचा बेटा आहे. त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

हेही वाचा - कंगनाकडून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा, शेअर केला बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ

दरम्यान, फडणवीस यांनी कंगनाच्याही प्रश्नावर बोलताना म्हटले की, कंगनाने मुंबईचा पीओके बाबत केलेला उल्लेख हा योग्य नाहीच. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशभरातून नागरिक मुंबईत आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कंगनाने केलेली तूलना निषेधार्हच आहे.

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Striving for justice for Sushant Singh said Devendra Fadnavis