स्ट्रक्‍चरल ऑडिटरला अटक

Crime
Crime

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय हा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारे नीरजकुमार देसाई यांना सोमवारी साकिनाका येथून अटक करण्यात आली. ते प्रा. डी. डी. देसाईज फार्मचे मालक आहेत.

हिमालय पुलासह दक्षिण मुंबईतील 36 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची जबाबदारी प्रा. डी. डी. देसाईज या कंपनीवर होती. हे पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल या कंपनीने दिला होता.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात भा. दं. संहितेच्या कलम 304 (2), 337 व 338 न्वये गुन्हा नोंदवण्यात आला. संशयितांना तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांच्याविरोधात कलम 304(2) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन प्रत्यक्षदर्शींसह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात पालिकेचे मुख्य अभियंते संजय दराडे यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com