‘या’ मार्गावर धावणार एसटीची स्लीपरकोच बस

‘या’ मार्गावर धावणार एसटीची स्लीपरकोच बस

पनवेल : शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवार यांच्या वतीने पनवेल आगारातून शेगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणाऱ्या नव्याने सुरू झालेल्या बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी चालक व वाहक यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

एसटीची रातराणी बससेवा कात टाकत असून खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करताना शयनयान व आसन बससेवा महामंडळ चालू करत आहे. त्यामुळे शेगाव-पाथर्डी रहिवासी परिवाराच्या अनेक दिवसांच्या मागणीला यश आले. शेगाव ते पनवेल ही शयनयान व आसन बस सुरू झाली आहे. या कार्यक्रमावेळी चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांचा राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राची लालपरी म्हणजे कर्मचाऱ्यांची जननी असून अत्यंत तुटपुंज्या वेतनावरसुद्धा चालक, वाहक प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा देतात. शेगाव आगारातील इतर कर्मचारीसुद्धा वेळोवेळी सहकार्य करतात. त्यामुळे त्यांचा सत्कार करताना विशेष आनंद होत असल्याचे मत चंद्रकांत देवढे यानी व्यक्त केले.

या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने पुश बॅक आसने व शयन (बर्थ) असलेली बस सेवेत दाखल केली आहे. या बसचे तिकीट दर जवळपास (शयन-आसन या दोन्हीसाठी) हिरकणी बसच्या दराएवढे आहे. या बसचे तिकीट दर जवळपास (शयन-आसन या दोन्हीसाठी) हिरकणी बसच्या दराएवढे आहे. ही विशेष गाडी सुरू करण्यासाठी सहकार्य करणारे शेवगाव आगाराचे आगारप्रमुख वासुदेव देवराज, सहायक कार्यशाळा अधीक्षक अनमोल फंड व परिवहन कर्मचारी यांचेही आभार 
मानण्यात आले.

प्रवाशांसाठी सेवा
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार/मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू आहेत. एसटीकडे सध्या साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बसद्वारे दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवासी स्लीपर बसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसनव्यवस्था उपयुक्त ठरते. म्‍हणूनच प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com