आरटीईच्या प्रवेशांकडे विद्यार्थ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राबवलेल्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रक्रियेंतर्गत तिसऱ्या सोडतीमध्ये ९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यापैकी केवळ १५५ विद्यार्थ्यांनीच शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने शिक्षण विभागाने आता प्रवेशासाठी २७ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर उर्वरित जागांकरिताची तिसरी सोडत ४ ऑगस्टला काढण्यात आली. या सोडतीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १८ ऑगस्टदरम्यान शाळांमध्ये प्रवेश घेता येणार होता; मात्र या मुदतीत केवळ १५५ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतले. 

Web Title: Student back RTE