पबजी गेमने घेतला विद्यार्थ्याचा बळी

पबजी गेमने घेतला विद्यार्थ्याचा बळी

डहाणू : दिवसेंदिवस तरुण पिढी ऑनलाईन गेमच्या आहारी जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या पबजी गेमची तरुणाईत बरीच क्रेझ दिसून येत असतानाच याच गेमने डहाणूतील एका एकोणीस वर्षीय तरूणाचा बळी घेतला आहे. हेमंत झाटे (19) असे त्याचे नाव असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

सध्या विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेम खेळताना दिसून येतो. आधी ब्लू व्हेल, मोमो चॅंलेज या गेम्सनंतर सध्या विद्यार्थी पबजी गेमच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून डहाणूतही अशी एक घटना समोर आली आहे.

डहाणूच्या इराणी रोड येथील वैभव कॅाम्प्लेक्स येथे राहणा-या चिराग मेहता यांच्या घरी वात्सव्यास असणा-या हेमंत झाटे याने बाल्कनीत फास लावून घेत आत्महत्या केली आहे. हेमंतचे वडील हे चिराग यांच्या गिरणीत कामाला असून हेमंतच्या शिक्षणाचा व रहाण्याचा खर्च चिराग उचलत होते. दरम्यान चिराग यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8 च्या सुमारास डोके दुखत असल्याचे सांगत हेमंत बाल्कनीत झोपायला गेला, त्यानंतर काही वेळाने मेहता त्याला पहायला गेले असता त्याने फास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दरम्यान मेहता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत हेमंत याने पबजी गेमच्या तणावातच आत्महत्या केली आहे. तो सतत त्याच्या मोबाईलवर पबजी गेम खेळत असायचा त्याला ब-याचदा खेळण्यापासून थांबवले असताना देखील तो ऐकत नव्हता असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com