हिटरचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू 

हिटरचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू 

पोलादपूर : वावे येथे विद्यार्थ्याला हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरमान इरफान मांदरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेमुळे अरमानच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत असताना अरमान अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी हिटर लावत होता. यावेळी अचानक हिटरचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत आरमान याचे वडील अपघातामुळे अपंग असून ते मुंबई येथील हॉटेलमध्ये काम करतात; तर त्याची आई गुडघेदुखीच्या आजाराने त्रस्त आहे.

आरमान कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com