माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर या खासगी शाळेतील 16 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला गुरुवारी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

सह्याद्री विद्यामंदिर या शाळेतील सकाळच्या सत्रातील सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून खिचडी देण्यात आली. शिक्षिकेने खिचडी चाखल्यानंतर ती विद्यार्थ्यांना देण्यात आली. काही वेळाने खिचडी खाल्लेल्या सर्वांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका आरोग्य समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना भालेराव यांनी सांगितले. खिचडीचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. तसेच रुग्णालयात उलट्या केलेल्या मुलांचे नमुनेही पालिकेने तपासणीसाठी घेतल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकारानंतर पालकांनी रुग्णालयात गर्दी करून गोंधळ घातला. दुपारी शाळेतून मुलांना घेऊन येताना ही बाब आम्हाला त्यांच्या इतर वर्गमित्रांकडून समजली. ही घटना संतापजनक असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

बचत गटाची चौकशी करणार
माध्यान्ह भोजनाचा पुरवठा करणाऱ्या लिंगेश्‍वर महिला बचत गटाचे काम थांबवण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक नसरिंग माने यांनी दिली. या महिला बचत गटाची चौकशीही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Student Poisoning