विद्यार्थिनीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २८) कांदिवलीत घडली. हर्षिका धीरेंद्र मायावशी  (१४) असे तिचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

हर्षिका कांदिवली पूर्वेकडील गार्डेनिया सोसायटीत आई-वडिलांसोबत राहत होती. शिकवणीला जाते, से सांगून ती गुरुवारी सायंकाळी घराबाहेर पडली; मात्र शिकवणीला न जाता ती नजीकच्या आर्चिड इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ‘रेफ्युजी’ भागात गेली. तेथे ती काही वेळ बसून होती. हर्षिता आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे समोरील इमारतीतील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला रोखण्यचा प्रयत्न केला; मात्र तिने कोणाचेही न ऐकता खाली उडी मारली. या प्रकरणी समतानगर पोलिस तपास करत आहेत.

Web Title: student suicide in mumbai

टॅग्स