
डोंबिवली : बदलापूर पाईपलाईन रोडचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम झाले आहे. मात्र गटारांची बांधणी तसेच सफाई योग्य न झाल्याने त्याचा फटका रस्त्याच्या लगत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. नेवाळी येथील संत सावळाराम महाराज विद्यालयात पावसाचे पाणी साचत आहे. तसेच या पाण्यात बाजूच्या गटारातील सांडपाणी मिसळत आहे. पावसात पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या घाण पाण्यात बसूनच शालेय धडे गिरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. याविषयी पालकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर पालकांनी याचे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल केले आहेत.