Thane Traffic: कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवा; माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Devendra Fadnavis: कल्याण शिळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सुभाष भोईर यांनी आज मुख्यमंत्र्यांना भेटून पत्राद्वारे केली आहे.
 Kalyan Shil Highway Traffic Jam

Kalyan Shil Highway Traffic Jam

ESakal

Updated on

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कल्याण शिळ महामार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्याचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, जेष्ठ नागरिक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्राद्वारे केली आहे. त्यावेळी कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील असे सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com