

Thackeray Group Subhash Bhoir Join BJP
ESakal
डोंबिवली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्क्यांवर धक्के दिले जात असतानाच, आता भाजपने थेट ठाकरे गटाच्या गोटात मोठी खिंडार पाडली आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. भोईर यांचा भाजपात प्रवेश म्हणजे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जातं आहे.